बारामती: कोरोना काळात सक्षमपणे निर्णय घेणारे व योग्य व्यवस्थापन करणारे सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.सदानंद काळे होते असे मत बारामती नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी व्यक्त केले.
डेंगळे गार्डन, बारामती याठिकाणी डॉ.सदानंद गोपाळराव काळे यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ 2023 च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सौ.तावरे बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ मा.नगरसेवक किरण गुजर, ऍड.सुभाष ढोले, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सुधीर पाटसकर, पं.स.चे गटविकास अधिकारी श्री.बागुल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ.अनिल काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, डॉ.विजय कोकणे, पं.स.चे प्रदीप धापटे, डॉ.बापू भोई इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.तावरे म्हणाल्या की, कोरोना काळात ज्या रूग्णांचे जीव वाचले त्यात डॉ.काळे व त्यांच्या टीमचे खुप मोठे काम आहे. माणसाचे काम माणसाला मोठं करीत असते त्याचपद्धतीने डॉ.काळे यांचे झाले आहे. डॉ.काळे हे संस्कारक्षम असुन त्यांच्यामध्ये संयम खुप आहे.
ऍड.सुधीर पाटसकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रात समस्या आहे. यामधील दुरावस्था पाहिली तर वाईट वाटते. याठिकाणी गरीब कुटुंबातील रूग्ण, विद्यार्थी लाभ घेत असतात त्याठिकाणी सेवा देणारे बहुजन असतात. त्यामुळे या दोन्ही क्षेत्राची दुरावस्था कोणी केली याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. याठिकाणी उर्जा आणण्याचे काम काही राजहंसासारखी काम करणारी मंडळी करीत असतात. महिला रूग्णालयामुळे खाजगी डॉक्टरांवर खुप मोठा परिणाम झालेला आहे. डॉ.काळे यांनी कोरोनामध्ये खुप मोठे काम केले. संवेदना जागृत असणार्या लोकांनी खुप मोठे काम केले. रिटायर्ड होणारी माणसे लवकर म्हातारे होतात. राजकारणी लोकं कधीच म्हातारे होत नाही. त्यामुळे कामामध्ये राहा, तुमची नागरीकांना गरज आहे. राजकीय क्षेत्रात भाग घ्यावा. तुमच्यासाठी मनसेची दारे उघडी आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
किरण गुजर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शासकीय सेवेतून रिटायर्ड होत आहेत. राजकीय सेवेता काळ 58 नंतर सुरू होतो. मग रिटायर्डमेंटची व्याख्या बदलायची का? असाही प्रश्र्न त्यांना पडलेला आहे. कोरोना काळात डॉ.काळे यांचा जवळचा अनुभव आला. सिल्व्हर ज्युबिलीमध्ये होऊन गेलेले सर्व डॉक्टर बारामतीकर झाले. डॉ.काळे यांनी सुद्धा बारामतीकर व्हावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. चांगली माणसे बारामतीच्या संपर्कात असणे खुप गरजेचे आहे. डॉ.काळे हे त्वचा रोग तज्ञ आहेत येणार्या रूग्णाच्या चेहर्याकडे बघता याचे दुखने काय आहे अंतर्मन व बाह्यमन सांगून जाते. पहिले कोव्हिड सेंटर नटराज नाट्य कला मंडळातर्फे उभे केले. असे एकुण 7 कोव्हिड सेंटर उभे करून 17 महिने चालविले. या सेंटरमध्ये 15 हजार 760 रूग्ण बरे झाले. यामध्ये डॉ.काळे, डॉ.खोमणे, डॉ.भोई यांच्या इतर डॉक्टरांचा खुप मोठे सहकार्य आहे. प्राण वाचविण्यासाठी पुढे आलो. डॉ.काळे यांनी रात्री अपरात्री सांगिलेली कामे नटराज नाट्य कला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केले. यावेळी विशाल जाधव, डॉ.कोकरे, डॉ.बापू भोई, डॉ.विजय कोकणे, श्री.बागुल, महेश रोकडे, श्री.खोमणे, तैनुर शेख इ. मनोगत व्यक्त केले.
शेवटी सत्काराला उत्तर देताना डॉ.काळे भावुक झाले होते त्यांनी सेवेचा कार्यकाळ त्यात केलेले खडतर परिश्रम याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी त्यांचे कै.आई-वडिल व पत्नी यांचा सुद्धा त्यांनी उल्लेख करून सर्वांचे आभार व्यक्त केले व दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी केले. तर शेवटी आभार डॉ.जगताप यांनी मानले. यावेळी बहुसंख्य वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, मित्र परिवार, महिला, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.