इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): ग्रामपंचायत तक्रारवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचारांची सत्तेमुळे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच मनिषा प्रशांत वाघ व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकार्यांचा माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते इंदापुर येथे सत्कार करतेवेळी श्री.पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजन दिपक वाघ यांनी केले.
पुढे श्री.पाटील म्हणाले की, यापुर्वीही तक्रारवाडी गावाच्या विकासांमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहेच. नुतन पदाधिकार्यांच्या माध्यमातुन गावाच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव येतील त्यासाठी पाठपुरावा करु व गावाच्या विकासासाठी सर्वेतोपरी सहकार्य करून निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही दिली.
तक्रारवाडी (ता.इंदापुर) ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन भाजपच्या मनिषा प्रशांत वाघ या सरपंचपदी निवडुन आल्या. निवडणुकीनंतर तक्रारवाडी ग्रामपंचातीच्या नुतन सरपंच मनिषा प्रशांत वाघ, उपसरपंच आशाताई जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ, प्राजक्ता वाघ, संगिता वाघ व गावातील पदाधिकार्यांनी माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापुर येथे भेट घेतली.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुतराव वणवे, कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ, माजी उपसरपंच प्रशांत वाघ, विजय जगताप, सचिन वाघ, गणेश वायदंडे, राजेंद्र वाघ, पोपट वाघ, बलभीम पिसाळ, उमेश वाघ,राजेंद्र गोडसे,बबलू वांझखडे, राजेंद्र आढाव, महेश वाघ,गणेश जराड,अभिनव वाघ, सूरज वाघ,रामभाऊ जाधव,जगन्ननाथ जगताप,मणेश खंडाळे उपस्थित होते. यावेळी तक्रारवाडीच्या उपसरपंच आशाताई जगताप यांनी भाजप प्रवेश केला.
यावेळी बोलताना नुतन सरपंच मनिषा वाघ म्हणाल्या, माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तक्रारवाडी गावाचा विकास झालेला आहे. यापुढील काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या, गटार योजना तसेच पाणी पुरवठा योजना आदी महत्वपुर्ण विकास कामांना गती देणार आहे.