इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): डॉ.बाबासाहेबांचे विचार अंमलात आणण्यासाठी एक नवीन विचार म्हणून तरूण पिढीला वाचनालय किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोतंडी गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ग्रामपंचायत गोतंडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री.नलवडे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे दादासाहेब डोईफोडे व जी.बी.पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.नलवडे म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी आदरांजली असेल. नवभारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे. बाबासाहेबांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे.
जयंतीच्या सुरूवातीस सरपंच गुरुनाथ नलवडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजापाठेने करण्यात आली.
यावेळी परशुराम जाधव, आबा मार्कड, नलवडे, छगन शेंडे, आप्पा पाटील, अनिल खराडे, काशिनाथअण्णा शेटे, हरिभाऊ रवी कांबळे, सुनील कांबळे, विभीषण नलवडे, महेश पवार, कांबळे दत्तू, बिबेवसंत कांबळे, हरिभाऊ खाडे पाटील, बापू पिसे, कुमार नलवडे, राजेंद्र साळवे, शिवाजी पाटील, सचिन पापत इ. उपस्थित होते.