जिथं मिळतात उच्च शिक्षणाचे धडे! त्याच तु.च.महाविद्यालयात तोडतात झाडे!!

बारामती(वार्ताहर): जिथं मिळतात शिक्षणाचे धडे, त्याच बारामतीच्या तु.च.महाविद्यालयात जाळतात व तोडतात झाडे अशी अवस्था झालेली आहे. या विरोधात बारामती नगरपरिषदेसह इतर ठिकाणी संबंधित संस्था चालक अध्यक्ष, सचिव व महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणात वृक्षांची बेकायदेशीर विनापरवानगी कत्तल करून वृक्षांच्या खोडाला आग लावून पूर्णपणे नेस्तनाबूद करण्याचा डाव केला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी पर्यावरण निर्मितीसाठी देशात 33% भूभाग वनखाली असावा असे निसर्गतज्ज्ञांचे सांगणे असताना, महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी बेकायदेशीर विनापरवानगी वृक्षांची कत्तल करून, त्यास खोडाला आग लावून पूर्णपणे नेस्तनाबूद केलेप्रकरणी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी केलेप्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे असे लेखी पत्रात नमूद केले आहे.

संबंधितावर गुन्हे दाखल करावे अन्यथा आपणा विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण करावे लागेल तसेच वेळपडल्यास मे.कोर्टात याचिका दाखल करावी लागेल असेही दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे.

सदर अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी बारामती व वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांना मेलद्वारे दिलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!