इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): तालुक्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून व भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे चालू आहेत तसेच अनेक नवीन विकास कामांना राज्य व केंद्र सरकारने मंजुरी व कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकास कामांची उद्घाटनाचे निमंत्रण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
ना.नितीन गडकरी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
सध्या संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. जून महिन्यामध्ये पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे ना.नितीन गडकरी यांनी या पालखी मार्गाची पाहणी करणे विषयी भेटीत चर्चा झाली. तसेच नवीन इतर विकास कामांवरही नितीन गडकरी यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी चर्चा केली.