बारामती(वार्ताहर):प्रत्येक युगात पाहिलं तर साधुसंतांनी माणसांना जागं करण्याचंच काम केलं आहे म्हणून साधू संतांची संगत मनुष्यासाठी प्रेरणादायी आहे असे उद्गार सातारा झोनचे ज्येष्ठ प्रचारक अविनाश जाधव(वाई) यांनी काढले.
आठरा फाटा येथे सोमवारी (ता.4) विशेष सत्संगाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी श्री.जाधव बोलत होते.

या सत्संग सोहळ्यास बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, माळेगाव सह. कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन तानाजी कोकरे, संगीता जगताप (उप सरपंच धुमाळवाडी), मछिंद्र वाघ (ग्रामपंचायत सदस्य सांगवी) इ.मान्यवरासह बारामती, फलटण, इंदापूर आदी भागातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
या जन समुदयाला संबोधित करताना श्री. जाधव पुढे म्हणाले, ज्याप्रकारे आदर्श विद्यार्थी घडण्यासाठी आदर्श शिक्षकाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आयुष्याच्या सुखकारक प्रवासाठी दिशादर्शक व ब्राम्हवेत्ता साधूंची आवश्यकता असते, कारण सद्गुरू हाच अंतिम मार्गदर्शक असतो. यासाठी आध्यात्माची आणि अशा सत्संगाची आवड गरजेचे आहे.
माणसाच्या जगण्या विषयीचे महत्त्व सांगताना श्री. जाधव म्हणाले माणसाचा जन्म झाला की तो मरेपर्यंत जगत असतो, पण आध्यात्म सांगतं की माणूस किती वर्षे जगला याला महत्व नसून तो कसा जगला याला महत्व आहे. कारण आयुष्यातील केलेली कर्म हीच त्या माणसाची खरी कमाई असते. असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले.
सदर सत्संग सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा क्षेत्राचे संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर उपस्थितांचे आभार सत्संगचे प्रबंधक बाळासाहेब जाधव यांनी मानले तर उत्कृष्ट मंचसंचालन बाळासो जानकर यांनी केले.