इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): रयतेचा राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कुठलेही नाव येत नसल्याचे प्रतिपादन जि.प.बांधकाम व आरोग्य समिती मा.सभापती प्रविण माने यांनी केले.
संयोजक पोपट नलवडे यांच्या नेतृत्वाखाली गोतंडी फाटा या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पुजापाठ वेळी श्री.माने बोलत होते.
यावेळी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, परशुराम जाधव, काशिनाथ अण्णा शेटे, दिनकर नाना नलवडे, युवराज अण्णा मस्के, आप्पा पाटील, अनिल खराडे, रवी कांबळे, हरिभाऊ खाडे पाटील, आबा मारकड, बिबीशनदादा नलवडे, सुनील कांबळे, छगन शेंडे, कुंडलिक भाऊ नलवडे, भारत साहेब नलवडे, ऍड.कुमार शिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.माने म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांनी वाचावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. महान, पराक्रमी होते. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जंक्शन पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.