बारामती(वार्ताहर): पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब याच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन 172 रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या शिबीराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश उर्फ बबलू जगताप, माजी नगरसेविका सौ.अनिता दिनेश जगताप व एसएसएस गु्रप बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते.
शिबीर उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष सभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, बारामती बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती शहरचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, डॉ.वाबळे, युवक शहराध्यक्ष अविनाश बादल उपस्थित होते.
यावेळी संतोष सातव, डॉ.सौरव मुथा, श्रीजीत पवार, महेश वारूळे, पत्रकार साधु बल्लाळ, अमोल तोरणे, अमोल यादव, मन्सूर शेख, योगेश नालंदे इ.मान्यवर उपस्थित होते.