चुकीचा गैरसमज पसरवून स्वतःची पोळी भाजण्याचा विरोधकांचा स्वभावच -आ.दत्तात्रय भरणे

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): चुकीचा गैरसमज पसरवून स्वतःची पोळी भाजण्याचा विरोधकांचा स्वभावच जात नाही हे दुर्देव असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

25 डिसेंबर रोजी भरणेवाडी येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभ वेळी आ.भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रतापराव पाटील, सचिन सपकळ, हनुमंत कोकाटे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.भरणे म्हणाले की, विरोधकांनी 19 ग्रामपंचायतींवर केलेला दावा खोटा असून तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 12 गावचे नूतन सरपंच व सर्वच्या सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत. उगाच चुकीचा गैरसमज पसरविण्याचे काम विरोधकांचे सुरू आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या यात काही ठिकाणी राष्ट्रवादीत दोन गट होते तर काही ठिकाणी समिश्र स्थिती होती. मात्र विरोधकांनी आमच्याच ग्रामपंचायत निवडून आल्याचा दावा केला काहीजण अगदी हुरळून गेले मात्र हे केवळ तालुक्यातील लोकांचा गैरसमज करण्यासाठी होते असे मत त्यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुका आता पार पडल्या आहेत गावातील मतभेद विसरून सर्वांना सोबत घेऊन गावाचा चांगला आराखडा तयार करा विकासाची कामे आपल्या भागात करून घ्या असे आवाहनही त्यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना केले आहे.

यावेळी झगडेवाडी सरपंच अतुल झगडे, कळाशी येथील नूतन सरपंच रुपाली गलांडे, कुरवली राहुल चव्हाण, म्हासोबाचीवाडी राजेंद्र राऊत, डिकसळ मनीषा गवळी, रणगाव योगेश खरात, न्हावी आशा डोंबाळे, ,बोरी सरपंच मंदा ठोंबरे, जांब सरपंच समाधान गायकवाड, लाखेवाडी सरपंच चित्रलेखा ढोले,माळवाडी सरपंच मंगल व्यवहारे यांच्यासह डाळज नं 3 चे 7 पैकी 5 सदस्य, हिंगणगावचे 7 पैकी 5 सदस्य, अजोती (सुगाव) येथील 7 पैकी 5 सदस्य, पिंपरी (शिरसोडी) येथील 11 पैकी 11सदस्य, डाळज नं 2 येथील 7 पैकी 5 सदस्य तर बेलवाडी येथील 13 पैकी 7 सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!