लॉक डाऊन परिस्थितीवर मात आणि माझी सर्जशीलता

दिनांक- आजची
वेळ- आत्ताची
ठिकाण- लॉक डाऊन मधले माझे घर
निवेदक – तुमच्यापैकीच एक लॉक डाऊन झालेला

घराच्या बाहेर छोटेसे कुम्पण. कुंपणाच्या आत मध्ये लावलेल्या बगीच्यामध्ये किचनमध्ये आवश्यक असणाऱ्या फळभाज्या ,कढीपत्ता ,शेवगा ,गवती चहा,आले इत्यादी.ओसरीवरच पाण्याने भरून ठेवलेली बादली त्यात मग आणि डेटॉल टाकलेले. शेजारीच सनिटायझर ची बाटली.
चप्पल चे स्टॅन्ड बाहेरच ठेवलेले.

बेडरूम नंबर एक :
एका कोपऱ्यात कॉम्प्युटर वर बसून मी झूम वरती दहावीच्या वेकेशन क्लासेस मध्ये भाग घेऊन अभ्यास करत आहे ,तिथे शेजारी माझा छोटा भाऊ राजवीर मस्त खेळाचा पसारा मांडून खेळ मांडला आहे. खेळातून कंटाळा आला की घरभर लावलेली भित्त चित्रांवर त्याची नजर जाते आणि आणि पक्ष्यांची ,प्राण्यांची, मुळाक्षरे ,फुले यांच्यात तो रममाण होऊन जातो. आजकाल शाळांना सुट्टी असल्यामुळे ही रूम आमची आभासी शाळा झालेली आहे. वह्या, पुस्तके, भीत्त चित्रे ,नोट्स, मम्मी ची शिकवणी यांच्या सोबतीला नुकताच केबल कनेक्शन जोडलेला कॉम्प्युटर मित्र आलेला आहे.

बेडरूम नंबर दोन :
या खोलीमध्ये पप्पांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. नवनवीन मिटींग ॲप्स ,कॉन्फरन्सिंग कॉल ,ई-मेल, व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल सोबतीला आल्यामुळे काम झटपट होऊन जातात. त्यांच्या व्यवसायांमध्ये वर्क फ्रॉम होम शक्य असल्यामुळे इंधनाची तर बचत होतेच शिवाय वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण हेही नियंत्रित होते.

बेडरूम नंबर तीन :
आजोबांची तब्येत आज-काल काहीशी नरम असते म्हणून त्यांनी स्वतःला सेल्फ qurintine करून घेतले आहे. आत मधेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची औषधांची आवश्यक वस्तूंची सोय करून ठेवलेलीच आहे. स्वतःलाही इतरांचा त्रास नको आणि इतरांनाही यांच्यापासून धोका नको म्हणून उतारवयात केलेली ही केवढी मोठी ऍडजस्टमेंट!

किचन :
भर पेठेमध्ये चालू असलेले काकांचे हॉटेल लॉक डाउनलोड बंद पडल्याने, हॉटेल मधल्या वडा पाव रेसिपी ची जागा आता छोट्याशा किचन मधल्या मेस नी घेतली आहे. बाहेरच्या कामगारांना आत येण्याची मुभा नसल्यामुळे मेसच्या स्वयंपाकाचा ताबा काकी ने घेतला आहे. नवीन नवीन रेसिपी बघणे ,शिकणे आणि करणे हा काकूंचा छंद आता आता व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. ज्यामुळे घराच्या आर्थिक परिस्थितीला पण हातभार लागतो आहे.तयार झालेले डब्बे ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कामगार स्वच्छता कामगार अनेक हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले रुग्ण आणि गरजू लोकांपर्यंत पोचवण्याचे काम काका चोख पणे करतात. यासाठी नगरपालिकेकडून पदार्थ बनवण्याची आणि ती वितरित करण्यासाठी घ्यावयाची स्वच्छता आणि काळजी यासाठी रीतसर परवानगी मिळवली आहे.

मार्केटमधून भाजीपाला आणणे आणि तो मिठाच्या किंवा सोड्याच्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून किचनपर्यंत पोहोचवण्याचे काम मोठ्या दादाने स्वखुशीने घेतले आहे. मार्केटमध्ये जाण्यासाठी मास्क आणि सनी टायझर चा वापर करून पण सोशल डिस्टन्ससिंग चे पालन कसे करायचे यासाठी “कोविंड 19 जागृतता” याचे रितसर प्रशिक्षण त्याने घेतले आहे. प्रशिक्षण घेतले असले तरी रोज रोज बाहेर जायचे नाही हे कटाक्षाने पाळतो.घरात एक छोटीशी डायरी तुम्हाला दिसेल. या डायरी त आम्ही आवश्यक असणाऱ्या वस्तूची नोंद करतो, आणि आठवड्यातून एकदा च बाहेर जाऊन याची खरेदी करतो. त्यामुळे त्याची दहावीची सुट्टी मार्गी लागली आहे.

हॉल :
खरं तर या घरात सगळ्यात जास्त मोबाईल रेंज असल्यामुळे मोठी दीदी दिवसभर तिकडेच असते. त्याच्यामुळे सगळीच ऑनलाईन कामे तिच्याकडे असतात. लाईट बिल भरणे, ई-पेमेंट , ई शॉपिंग, बँकेचे सगळे व्यवहार , सगळ्यांची मोबाईल बिल, रिचार्ज सगळ्या कामे ती हातासरशी पूर्ण करते. त्यामुळेच अशा कामासाठी घराबाहेर जाऊन रांगेत उभा रहायच या गोष्टी ला आळा बसला.

पलीकडेच कोपऱ्यात टेबल आणि एक फोन. मानसोपचार तज्ञ म्हणून काम करणारी मम्मी आता कर्फ्यू असल्यामुळे सध्या घरातून मानसिक रुग्ण असणाऱ्या किंवा मानसिक आधाराची गरज असणाऱ्या रुग्णांना फोनवरून ,ऑनलाईन सेवा पुरवते. त्याचे पेमेंट पण ती कॅशलेस च घेते. उरलेल्या वेळात आमचा अभ्यास घेणे , शिलाईमशीन वरती मास्क हातमोजे शिवणे हे काम आनंदाने करते.

शाळेत टीचर असलेल्या छोट्या आत्याला आता घरातूनच ई टिचिंग पर्याय खुला झाला आहे.त्यामुळे ती टेरेसवरून, जिन्या मधून , बागेतून अगदी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात उभी राहून सध्या ती क्लासेस घेत आहे. मीटिंग ॲप मधून ऑनलाइन मुलांना शिकवणे ,त्याचबरोबर त्या-त्या विषयासंदर्भात स्वतःचा व्हिडिओ युट्युब वर अपलोड करून अधिका-अधिक मुलांपर्यंत तो पोचवणे यात तिचा वेळ अगदी सहज निघून जातो.मुळातच टिक टॉक वरती व्हिडिओ तयार करण्याची तिची ही आवड सध्या तिच्या प्रोफेशन मध्ये कामी येत आहे.

खरंतर लोक डाऊन चालू झाल्यापासून प्रत्येकाने आपले वेळापत्रक तयार केले आहे. कारण सुरुवातीला झालेली चिडचिड मानसिक त्रास पाहता आणि वाढत चाललेल्या लॉक डाऊन त्याच्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला काही नियम आणि बंधने घालून घेतले. लॉक डाऊन जाहीर झाल्याबरोबर सगळ्यांचीच जीवनशैली बदलून गेली उशिरा उठणे ,अवेळी घेतलेला चहा, जेवणाच्या वेळा बदलल्या, जागरण यामुळे मानसिक ताना बरोबर शारीरिक त्रास होऊ लागला. शेवटी सर्वानुमते दोन वेळापत्रक तयार करण्यात आले. एक कुटुंबाचं आणि दुसरं वैयक्तिक.

कुटुंबाच्या वेळापत्रकानुसार सर्वजण सकाळी लवकर उठून स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी टेरेस वरती फिरण्या बरोबरच सूर्यनमस्कार, व्यायाम ,योगासने दोरीवरच्या उड्या हे प्रकार करतो. आणि मानसिक आरोग्य साठी पंधरा मिनिट ध्यानस्थ बसून मेडिटेशन, प्राणायाम केले जाते.नंतर एकत्र येऊन नाश्ता करत करत दिवसभराचे प्लॅनिंग करतो. नाश्त्यामध्ये आवर्जून सी जीवनसत्व युक्त फळ आणि प्रोटीन चा समावेश असतो. चहाला पर्याय म्हणून आलं , दालचिनी , सुंठ घातलेला कोरा चहा सर्वजण पितो. त्याच मुळे छोटे-मोठे संसर्ग दूर ठेवायला मदत होते.

जसं सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतो अगदी तसंचदिवसभर प्रत्येक जण वारंवार हात धुऊन सनी टायगर वापरण्याची सवय अंगवळणी पडून गेली आहे. काही कारणास्तव बाहेर जाताना मास्क लावणे आणि बाहेरून आलं की अंघोळ करणे हे जणू नित्याचे झाले आहे. त्यासाठी आता कुणीच कुणाला कसल्याही सूचना करत नाही. शेवटी वैयक्तिक स्वच्छतेची जबाबदारी ज्याची त्याचीच असते ना?

आता राहिला प्रश्न घराच्या स्वच्छतेचा. बाहेर कोरोणासारख्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना स्वच्छतेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे घरातील स्वच्छता आपापल्या खोलीप्रमाणे विभागून घेतली आहे. मानसिक आरोग्य च म्हणाल तर त्यासाठी. संध्याकाळी बागेत एकत्र बसून नातलगांना फोन करणे. बुद्धिबळ, कोडी सोडवणे कॅरम सारखे खेळ खेळणे, दिवसभराच्या गप्पाटप्पा जुने अनुभव शेअर करणे, घरातील एकमेकांच्या अडचणी सोडवणे, बागकाम अशा गोष्टींमुळे बाहेरच्या वातावरणाचा आलेला ताण कुठल्या कुठे पळून जातो.
आता तुम्ही मला म्हणाल की लॉक डाऊन मात कशी करायची? हे देशपातळीवर, राज्य पातळीवर ,जिल्हा पातळीवर, सांगायचं सोडून मी तुम्हाला माझ्या घराचं काय सांगत बसलोय? तर लक्षात घ्या कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या कृतीतून होत असते,छोट्या पातळीवरून होत असते, स्वतःपासून होत असते. जसे की आमच्या घरात लॉक डाऊन मुळे हताश न होता, जिद्दीने नवनवीन पर्याय शोधून , युक्तीने, सुयोग्य नियोजनाने स्वतःची आवड जपत ,आहे हाच व्यवसाय नव्या पद्धतीने कसा करता येईल यावर मार्ग शोधले. याच मार्गांनी गाव पातळी , जिल्हा पातळी, राज्य पातळी आणि देश पातळीवर जाऊन लॉक डाऊन च्या परिस्थितीवर सर्जनशीलतेने मात करता येईल.

© सौ अभिजिता नवनाथ जगताप

abhijita.jagtap@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!