बारामती(वार्ताहर): माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी बारामतीचे मंगलदास निकाळजे यांच्या कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेश्र्वर यांनी नियुक्तीपत्र देवून निवड केली.
आमदार निवासस्थान विधान भवन पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची तातडीची बैठक पार पडली. सदरची बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडली.
यापुर्वी निकाळजे यांच्याकडे पुणे जिल्हा मुख्य प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळीत होते. या काळात त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4 ची अंमलबजावणी करण्यासाठी कित्येक कार्यालयांना भाग पाडले. रुग्णाना त्यांच्या हक्क व अधिकाराबाबत माहिती व्हावी म्हणून प्रत्येक हॉस्पिटलने दर्शनी ठिकाणी रूग्ण हक्काची सनद लावण्यासाठी संबंधित खात्याचे आदेश करुन घेतले व ती सनद लावण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे माहिती अधिकार दिन, संविधान दिन संबंधित विभागात साजरे करण्यास भाग पाडले. बारामती तालुक्यात होत असलेल्या अवैध मुरूम व इतर प्रकारच्या गौण खनिजाच्या तक्रारी करुन त्या अंतिम टप्प्यात आणल्या आहेत काही दिवसात संबंधितवर दंडात्मक स्वरूपाची कार्यवाही होऊन शासनाला कित्येक कोटींचा निधी मिळणार आहे अशा अनेक प्रकारची कामे करून समाजाची व शासनाची सेवा केलेली आहे.
निकाळजे हे अभ्यासपूर्ण विविध प्रकरणे हाताळतात व ते तडीस नेतात हा त्यांचा खूप मोठा हातकंडा आहे. मध्यंतरी निकाळजे यांना उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर निकाळजे यांनी सांगितले कि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सदस्य वाढवून माहिती अधिकार कायदा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवून लोकांचा सहभाग शासकीय कारभारामध्ये जास्तीत जास्त करुन घेणार आहे व शासन कारभार पारदर्शतेने चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, व सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवून लोकहिताची कामे करणार आहे तसेच भ्रष्टाचार मुक्त शासन कारभार करणार असल्याची भूमिका मांडली आहे.