बारामती(वार्ताहर): निसर्गाच्या सान्निध्यात राहून लाकडात जीव ओतुन निर्जीव लाकडांना सजीव करण्याचे व त्यामधुन सामाजिक संदेश देण्याचे काम प्रसिद्ध काष्ठशिल्पकार राहुल लोंढे हे करीत आलेले आहेत.
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.12 डिसेंबर 2022 रोजी नटराज नाट्यकला मंडळ यांच्या वतीने प्रसिद्ध काष्ठशिल्पकार राहुल लोंढे यांचे काष्ठशिल्प प्रदर्शन आयोजित केले होतो.
या प्रदर्शन उद्घाटन विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे यांचे हस्ते झाले. प्रमुख पाहुणे जेष्ठ संगीततज्ञ आबासाहेब परकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, बाळासाहेब जाधव, हनुमंत पाटील, मा.नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, भारती मुथा इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सदर प्रदर्शनात अनेक कलाकृती,शिल्प ठेवण्यात आली होती ही सर्व शिल्प उपस्थितांचे मन वेधुन घेत होती सदरील प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिल्पकार राहुल लोंढे सर व नटराज नाट्यकला मंडळ यांनी परिश्रम घेतले. सर्वत्र शिल्पकार राहुल लोंढे यांचे कौतुक होत आहे.