बारामती(वार्ताहर): देशाचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेल बारामती तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल कल्याण केंद्र या मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळेत शालेय उपयोगी वस्तु, फळे व मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष अविनाश बांदल, युवती शहराध्यक्षा सौ.आरती शेंडगे, सोशल मीडियाचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, जागृती अपंग संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष अजिज शेख, प्रहार संघटनेचे फरिद शेख, मधुकर वायकर, लक्ष्मण गायकवाड, नीता ढवाण उपस्थित होते.
अनिता गायकवाड मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला आहे. पवार साहेब, दादा, ताई व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिव्यांगाचे प्रश्र्न मार्गी लावले जातील यासाठी मी जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अविनाश बांदल, आरती शेंडगे, प्रवीण गालिंदे, हरिभाऊ जाधव, कैलास शिंदे, सुनिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
शेवटी केक कापून वस्तु व खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेलचे बारामती तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव, शहराध्यक्ष कैलास शिंदे, तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव, लहू भिलारे, कार्याध्यक्ष महादेव मोहडे, शहरचे नामदेव चांदगुडे, दत्ताभाऊ शिंदे व दिक्षा साळवे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची रूपरेषा व सूत्रसंचालन पंचायत समितीचे दिव्यांग अधिकारी संदीप शिंदे यांनी केले.