सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आत्मदहन करावे लागेल – अर्जुन कोळी

नगरविकास व नाकर्ते सरकारच्या विरोधात आझाद मैदानावर धरणे आंदोलन

बारामती(वार्ताहर): नगरविकास खात्याला जाग आणण्यासाठी नाकर्ते सरकारच्या विरोधात 16 जानेवारी रोजी 10 हजार शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहोत याची दखल जर शासनाने न घेतल्यास नाईलाजास्तव आत्मदहन करावे लागेल असाही इशारा राज्य नपा व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी केली.

महाराष्ट्र शासन केवळ जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांना आपले शिक्षक नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांवर सातत्याने अन्याय करीत आहेत. 100% वेतन व पदोन्नतीत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यातील 10 हजार शिक्षक मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचेही श्री कोळी यांनी सासवड येथे आयोजित महामंडळ सभेत बोलताना सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष संजय आवळे, कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंखे, ट्रस्ट सचिव शिवाजीराव राजिवडे, ट्रस्ट उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, अमरावतीत विभागीय नेते संजय चुनारकर, राज्य महिला आघाडी सदस्य सौ.दिपाली गायकवाड, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष देविदास ढोले, सरचिटणीस आण्णा नामदास, जुनी पेन्शन योजना अध्यक्ष सुभाष वणवे यांची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले की, ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी शासन आदेश काढते. मात्र नगरविकास विभागास नपा व मनपा शिक्षकांचा विसर पडला आहे. सर्व धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी घेतले जातात. मात्र नपा व मनपा शिक्षकांना वगळले जाते. 100% वेतनासाठी संघर्ष करावा लागतो. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यापासून सातत्याने मागणी करुनही एकाही प्रश्र्नांची दखल घेतली नाही. पदोन्नती, ऑनलाईन बदली पोर्टल, या सारखे गंभीर प्रश्ना कडे नगरविकास विभागाने कधीच लक्ष दिले नाही. राज्यातील नपा व मनपा शिक्षकांना 100% वेतना साठी सतत संघर्ष करावा लागतो ही खेदाची बाब आहे. नगरविकास विभागास जाग आणण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावरही शासनाने दखल न घेतल्यास नाविलाज म्हणून आत्मदहन करावे लागेल असा इशारा कोळी यांनी नगरविकास विभागास दिला आहे. यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!