बारामती(वार्ताहर): डोंगराला आग लागली पळा..पळा.. हे वाक्य आपण लहानपणी सहज खेळता खेळता बोललो मात्र, तीच आग प्रत्यक्षात पाहता पळताभूई झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच आग गणेश जाधव, पप्पू शितोळे व राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहरचे कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी पाहिली व ती विझविण्यासाठी जो खारीचा वाटा उचचला त्यामुळे पुढील अनर्थ टळला व या सर्वांचा जीव भांड्यात पडला.
तांदुळवाडी गट नं.324 वन विभागाच्या अंतर्गत येणार्या जागेत काही मद्यपींनी मद्यपान करून सिगारेट टाकली. कालांतराने याठिकाणी आग लागली आगीने रूद्ररूप धारण केले. या आगीमुळे मोठ्या झाडांच्या फांद्या जळून खाक झाल्या. सदरची आग लागल्याचे तांदुळवाडीचे रहिवाशी रायझिंग महाराष्ट्राचे पत्रकार गणेश जाधव व पप्पू शितोळे यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने विशाल जाधव यांना कल्पना दिली.
जाधव यांनी वन विभागाचे बाळासाहेब गोलांडे, मेजर लोंढे, मुख्याधिकारी महेश रोकडे, श्री.कुलावर, बंडा मोरे, आ.अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना याबाबत सांगून आगीच्या ठिकाणी धाव घेतली. या सर्वांनी अग्नीशमन दलात सांगितले. अग्नीशमन दलाचे श्री.इंगोले, श्री.माने व त्यांचे टीमने सदरील आग विझविण्यास मदत केली.
या आगीची वार्ता पसरताच तांदुळवाडी भागातील गणेश शितांळे, अरूण जाधव, वायरमन श्री.सुर्यवंशी, आबा खोमणे, तेजस सरोदे, योगेश सरोदे, राजेंद्र सरोदे, दत्तात्रय सरोदे, मनिषा राजेंद्र सरोदे, बबीता दत्तात्रय सरोदे, सुलोचना आनंदा सरोदे, बबलू जाधव, विनोद जाधव, समाधान काळे वन विभागातील प्राण्यांना इजा होऊ नये म्हणून सर्पमित्र यश जाधव व प्रतिक सोकटे तसेच ग्रीन वर्ल्ड फौंडेशनचे सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले.