बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी सुरेंद्र जेवरे बारामती लोकसभा मतदार संघावर केले लक्ष्य केद्रीत..!

बारामती(वार्ताहर): महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार व माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरेंद्र शामसुंदर जेवरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे देण्यात आली. बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करीत बारामती, इंदापूर, दौंड या तीन तालुक्यांची विशेष जबाबदारी त्यांना देण्यात आली.

हॉटेल कृष्णसागर याठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरूवातीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्ह्यातील व बारामती, इंदापुर, दौंड विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती पत्र देण्यात आले. काही युवकांचा व महिलांचा पक्ष प्रवेश घेण्यात आला.

बारामती, इंदापूर व दौंड या तीन तालुक्यामध्ये तालुकावार प्रभावीपणे संघटनेची उभारणी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. केंद्र व विविध योजनांचे लाभ सर्वसामान्या नागरिकापर्यंत पोहचवणे, महिला व युवकांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध करुन देणे कामी त्यांना मार्गदर्शन करणे, गरीब गरजु रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध करुन देणे, शेतकर्‍यांचा उत्पन्न वाढीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. तसेच स्थानिक सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गैरकारभार रोखुन भ्रष्टाचार मुक्त बारामती करणे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा.माजी मंत्री विजय शिवतारे यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले व त्यांनी टाकलेला विश्र्वास सर्व सहकार्यांच्या व पदाधिकार्‍यांच्या मदतीने सार्थ करण्याची ग्वाही सुरेंद्र जेवरे यांनी दिली.

जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- सुरेंद्र शामसुंदर जेवरे (जिल्हाप्रमुख, कार्यक्षेत्र बारामती, इंदापुर,दौंड), सौ.सिमा प्रशांत कल्याणकर – महिला आघाडी जिल्हा संघटक (कार्यक्षेत्र -बारामती, इंदापुर, दौंड), पप्पु (वस्ताद) माने – जिल्हा कार्याध्यक्ष (कार्यक्षेत्र-बारामती, इंदापुर, दौंड) दत्तात्रय गावडे पाटील-उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र -बारामती), प्रकाश पंडीत शेळके -उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र-इंदापुर), तानाजी (बाबाराजे) निंबाळकर – उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र-इंदापुर), स्वप्निल शहाजीराव जगताप – तालुकाप्रमुख बारामती तालुका, आदेश शरदराव इंगुले – शहरप्रमुख बारामती शहर, अमोल नरहरी देवकाते-युवासेना बारामती तालुका संघटक, संदीप (बाबु) नरसिंग पवार – युवासेना संघटक बारामती शहर, अरबाज आलताफ बागवान – युवासेना उपसंघटक बारामती शहर, सौ.गौरी गजाननराव चौधरी/दिक्षित – महिला आघाडी शहर संघटक बारामती शहर, ऍड.बापु बाबुराव दिवेकर- तालुकाप्रमुख दौंड तालुका, अनिल दिवेकर – युवासेना प्रमुख, दौंड तालुका, श्रीनाथ माणिकराव ननवरे – शहरप्रमुख दौंड शहर, रामचंद्र विठठ्ल जामदार – तालुका कार्याध्यक्ष इंदापुर तालुका, अशोक बाबु देवकर – शहर प्रमुख इंदापुर, आण्णासाहेब काळे – युवासेना संघटक, इंदापुर तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!