लोकांचा करिअरचा ग्राफ त्यांच्या वयानुसार किंवा अनुभवाच्या जोरावरती वाढत वाढत उंच उंच जातो..
करिअरचा ग्राफ जेवढा उंच तेवढा समाधान जास्त..
माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं घडलं.. करिअरचा ग्राफ उंच जाण्याऐवजी समृद्ध होत गेला… हो समृद्धच म्हणायला हवं.. सुरुवात तर केली होती.. पणदरे सारख्या छोट्या गावातील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधल्या टीचर कम ट्रेनर कम असिस्टंट कम सर्वेसर्वा.. थोडक्यात हे इन्स्टिट्यूट तुम्ही सांभाळा… सारख्या जॉब ने.. खरं सांगू का त्यावेळी पगाराशी काही घेणं देणं नव्हतं.. एसटीने जाण्या-येण्या पुरता होता फक्त.. पण दिवसभर कॉम्प्युटर वापरायला/शिकायला /शिकवायला मिळायचा हे काही कमी नव्हतं.. कॉम्प्युटर मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण कॉम्प्युटर वापरण् हे माझ्यासाठी आसुसलेपण होतं.. खऱ्या अर्थाने पहिल्या जॉबचा हा फायदा झाला की छोट्या ऋतूला मला सोडून राहण्याची सवय झाली आणि मला कॉम्प्युटर वापरण्या बद्दल “कॉन्फिडन्स” आला जो ग्रॅज्युएशन करून पण आला नव्हता. याच जॉब च्या तीन महिन्याच्या अनुभवावरून आमच्या गावातल्या विठ्ठल माध्यमिक हायस्कूलमध्ये “कॉम्प्युटर टीचर” म्हणून महिना बाराशे रुपयावर माझा करिअर ग्राफ येउन स्थिरावला.. फक्त तीन महिन्याची एक एम. एच.सी. आय. टी. ची बॅच घेतलेली..
पण कम्प्युटर बद्दल स्वतःमध्ये इतका कॉन्फिडन्स आला की याच क्षेत्रात पुढे काही तरी करायचा निर्धार पक्का झाला.. पोस्ट ग्रॅज्युएशन ला पर्याय सी-डॅक चा.. 9 महिन्याच्या ऋतूला आजीकडे ठेवून सी-डॅक पूर्ण केलं.. तेव्हा सी-डॅक 11 इंटरव्यू कॉल द्यायचे.
माझं पहिलेच कॉल मध्ये MNC Company सिंपोनी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड बाणेर ला सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून सिलेक्शन झाले. कंपनीने सुरुवातीलाच साडे दहा हजार ची ऑफर दिली.
त्यापेक्षा पण महत्त्वाचं… आणि आनंदाचं म्हणजे,
सौ. अभिजिता जगताप
ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनी इंजिनीयर.
नावाचं व्हिजिटिंग कार्ड जेव्हा बनलं तेव्हा असे वाटलं बस्स याच साठी केला होता अट्टाहास.. आयटी करियरच्या सुरुवातीलाच MNC मिळाल्याचा आनंद तर होताच, पण त्यापेक्षा जास्त पणदरे यासारख्या खेड्यात राहून, 9 महिन्याच्या ऋतु पासून लांब असून पण फक्त ग्रॅज्युएशन वर सीडॅक करणारी आणि पहिल्या कॉल मध्ये कंपनी मिळवणारी ती मीच.
यथावकाश समजून आलं कॉम्प्युटर ग्रॅज्युएशन नंतर सी-डॅक करून पण पोस्ट ग्रॅज्युएशन किती महत्वाचा आहे ते.. मग काय घेतलं एम.सी.एस. ला ऍडमिशन.. पण फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन करण्या ऐवजी बरोबरच बारामतीमध्ये एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर लँग्वेजेस चे क्लासेस घ्यायला सुरुवात केली..
इथुनच माझ्यातील टीचिंग स्किल डेव्हलप होत गेलं.. स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना इंजिनीअरिंगच्या मुलांना कॉम्प्युटर लॅंग्वेज शिकवत होते.. तेव्हाच समजलं तुमच्याकडे “नॉलेज” असेल तर “डिग्रीचा” काहीच फरक पडत नाही.. कॉम्प्युटर मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून तसेच C-DAC डिग्री हातात असताना पण बारामती सारख्या शहरात सॉफ्टवेअर कंपन्यांची वानवा असल्यामुळे परत एकदा लेक्चरशिप कडे वळाले.
दोन प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये, आणि एका कॉलेजमध्ये, तसेच घरातून स्वतः एम.सी ए, एम. सी. एस, बी. इ च्या मुलांना प्रोजेक्ट बनवून द्यायचे.. त्यासाठी स्वतःची स्मार्ट बीट इन्फोटेक नावाची सॉफ्टवेअर फर्म सुरू केली. बऱ्याच वेबसाईट सॉफ्टवेअर बनवून दिले. याच्यातून उत्पन्न म्हणाल तर मी याच्यातून माझ्यासाठी एक डेल कंपनीचा लॅपटॉप विकत घेतला..
उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन विचार केल्या तर या सगळ्या गोष्टी तून मला आत्मसात झालेल्या गोष्टी म्हणजे एक्सपिरीयन्स साठी फुकट काम करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, प्रोजेक्टची रिक्वायरमेंट व्यवस्थित घेऊन त्यानुसार दिलेल्या वेळामध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करून देणे, वेगवेगळ्या कॉम्प्युटर लँग्वेजेस इम्पली मेंट करणे, प्रोजेक्ट ची किंमत ठरवणे, ती विद्यार्थ्यांना पटवून देणे, इन्स्टिट्यूट संभाळणे, कित्येकदा मुलांच्या अडचणी समजून घेणे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. मग ती कॉलेजमध्ये एखाद्या सब्जेक्ट शिकवण्यासाठी दिलेली कमिटमेंट असो. किंवा ठराविक दिवसात एखाद्याचा प्रोजेक्ट करून द्यायची खात्री असो. किंवा आठवडाभर इन्स्टिट्यूट सांभाळायची असो. जबाबदारी घेणे आणि पार पाडणे यातूनच तर शिकले..
त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजला वर्कशॉप ,सेमिनार , हे चालू च होतं. म्हणतात ना “भगवान के घर में देर है मगर अंधेर नही” याप्रमाणे लॅरी वील के या USA मधील व्यक्तीने माझा इंटरव्यू घेऊन बारामतीतील डायनॅमिक्स कंपनीत आय एस (INFORMATION SYSTEM) डिपारमेंट मध्ये माझी कॉर्डिनेटर सीनियर असोसिएट म्हणून नेमणूक झाली. इथे मात्र माझ्या करिअर चा ग्राफ आर्थिक दृष्ट्या अधिक उंच गेला. पण त्याहीपेक्षा जास्त चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे आयएस डिपार्टमेंटमध्ये तसेच पूर्ण हेड ऑफिस मध्ये 53 च्या ऑफिसर स्टॉप मध्ये मी एकटीच लेडी. मग काय सगळ्यात अवघड गोष्ट मी शिकून घेतली.. ती म्हणजे पुरुषी वर्चस्व असणाऱ्या जागी, सहकार्याशिवाय काम करणे. पगार तर जास्त कमावला पण त्याच्यापेक्षा जास्त अनुभव मिळवला. Oracle 11g मध्ये सिस्टम डेव्हलपमेंट करायला मिळाली. ज्या महिन्यात पर्मनंट झाले, त्याच महिन्यात आईचं अपघाती निधन झालं, आणि त्याच महिन्यात रीझाईन केल. अर्थातच ऋतुराज लहान होता म्हणून..
टीचींग चा अनुभव तर होताच. मग काय टी. सी. कॉलेजला प्रोफेसर म्हणून जॉईन केलं. 2 वर्षांनी राजवीरच्या वेळी डिलिव्हरीसाठी परत एकदा टिचिंग ला राम राम केला. आयबीपीएस तर्फे बँकिंग साठी बीएफ (बिजनेस फॅसीलेटर) च्या पोस्टसाठी एक्झाम दिली आणि पास झाले.. मग काय छोट्या राजवीरला सांभाळता सांभाळता, छोटी स्टेट बँकेची ब्रांच पण सांभाळली. एसबीआय ची मायक्रो ब्रांचं. शिपायापासून मॅनेजर पर्यंत सर्वे सर्व मीच. सकाळी मेन ब्रांच मधून कॅश घेऊन यायचे आणि दिवसभर अकाउंटला पैसे ट्रान्स्फर, व विड्रॉ करणे, पेन्शनर लोकांची फक्त अंगठ्याच्या स्कॅन वरती देणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन बँक अकाउंट काढून देणे, खात्याला आधार कार्ड जोडून देणे ही सर्व कामे एक हाती करावी लागत होती.
एवढे कमी की काय म्हणुन त्यातच नोटबंदी झाली. “इथे जुन्या नोटा बदलून मिळतात का हो?”
इथपासून ते “जुन्या नोटा किती टक्केवारी त बदलून देणार?” “तुमच्याकडे नवीन 2000 च्या नोटा मिळतील का?” “तुम्हाला किती पगार मिळतो?तुम्ही स्टेट बँकेचे कर्मचारी मग तुम्ही स्टेट बँकेत का नाही बसत?” इथ पर्यंतच्या प्रश्नांना दुर्लक्ष करायला मी शिकले.
पंतप्रधान योजनेतून गरोदर मातांना मिळणारा लाभ घेण्यासाठी 9 महिने अवघडलेल्या अवस्थेपासून ते 4 दिवसाच्या बाळाला घेऊन आलेली स्त्री लांबच लांब रांगेत उभारलेली पहिली की की त्यांच्यासाठी सर्व नियम डावलून त्यांची मदत केली. पण “प्रधानमंत्री यांनी पाठवलेले 15 लाख आले का हो माझ्या खात्यात” चेक करायला आलेल्या माणसांच्या बाबतीत मी काहीच करू शकले नाही.
तीन वर्ष सक्षमपणे ब्रांच सांभाळल्यानंतर.. “अहो” च्या बदलीमुळे सिन्नरला यावं लागलं. परत एकदा टिचिंग. पोस्ट ग्रॅज्युएशन ला शिकवण्याचा अनुभव तर होताच, शारदा कॉलेजमध्ये येऊन ग्रॅज्युएशनच्या मुलांना शिकवण्याचा चान्स मिळाला. त्यांच्याबरोबर मी पण थोडी “मॅच्युअर” झाले.
Hmmmmm
अशाप्रकारे टिचिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,क्लासेस, बँकिंग, परत टिचिंग पर्यंत येऊन पोहोचलेला माझा करिअरचा प्रवास. अहमदनगर मध्ये येऊन नवीन कोणत्या क्षेत्राची कवाडे खुली करतोय बघुयात…
कुछ न कुछ तो करूं लुंगी..जरूर
सौ अभिजिता नवनाथ जगताप
abhijita.jagtap@gmail.com