नगरसेविका अनिता जगताप यांचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेस प्रशासनास सहकार्य

बारामती (वार्ताहर): राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत तीन दिवसात बारामती शहरात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची चाचणी करण्याचे ठरविले. या मोहिमेस प्रभाग क्र.19-क च्या नगरसेविका सौ.अनिता दिनेश जगताप तसेच दिनेश जगताप यांनी प्रशासनास सहकार्य केले.

सौ.अनिता जगताप या सतत आपल्या प्रभागात विविध समाजोउपयोगी उपक्रम राबवीत असतात. इंदापूर रोडवरील प्रत्येक कुटुंबियांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अडीअडचणीला व मदतीला धावणार्‍या सौ. जगताप नगरसेविका म्हणून याठिकाणी बोलले जाते.

आमचा प्रभाग, सुरक्षित प्रभाग यामाध्यमातून सौ.अनिता जगताप यांचा सतत प्रयत्न असतो. त्यामाध्यमातून प्रभागातील प्रत्येकांनी तपासणी करून घेणेबाबत ते आवाहन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!