उत्कृष्ट तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य डॉ.अविनाश जगताप तर उत्कृष्ट समन्वयक प्रा.सलमा शेख पुरस्कारांनी गौरव

बारामतीः महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेल्या “करिअर कट्टा” उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्पर्धा 202-526 मध्ये उत्कृष्ट तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य डॉ.अविनाश जगताप तर उत्कृष्ट समन्वयक प्रा.सलमा शेख पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल 26 जानेवारी 2026 रोजी जाहीर झाला होता.

या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ 26 फेब्रुवारी 2026 रोजी एच.व्ही.देसाई कॉलेज, पुणे येथे उत्साहात पार पडला.

यामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट प्राचार्य हा पुरस्कार डॉ.अविनाश जगताप यांना प्राप्त झाला तसेच बीबीएसीएच्या विभाग प्रमुख प्रा.सलमा शेख यांना उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

महाविद्यालयाच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे हे फलित असल्याचे मत प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी व्यक्त केले.

याबद्दल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे पदाधिकारी, सर्व सदस्य, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!