बारामती(वार्ताहर): देशाचे भाग्यविधाते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर महीला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षा सौ.अनिता सुरेश गायकवाड व महीला सदस्यांच्या वतीने थायरॉईड, हिमोग्लोबिन तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत श्रीमंत आबा गणपती मंदिर जवळ आयोजीत करण्यात आले आहे शिबिरात 83 रक्तदात्यानी रक्तदान केले. वरील रक्तदान शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील, साधु बल्लाळ, ऍड.धीरज लालबिगे, शहर युवकाध्यक्ष अविनाश बांदल, प्रवीण आहुजा राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष भारतीताई शेवाळे, आदित्य हिंगणे, विशाल जाधव, रमेश पंजाबी, तुषार लोखंडे इ. मान्यवर उपस्थित होते. अनिता गायकवाड, श्रीकांत जाधव, सुनील लडकत, मोहन भटियांनी, अविनाश भापकर, स्वप्निल भागवत, प्रकाश पळसे, राहुल जाधव निलेश गायकवाड, अभी बागल, संतोष जगताप यांनी मान्यवरांचे आभार मानले.
राष्ट्रवादी महिला कॉंगेस बारामती शहरने केलेल्या कामाचे शहर अध्यक्ष जय पाटील व भारतीताई शेवाळे यांनी कौतुक केले.