नटराजमध्ये कविसंमेलन, ग्रंथदिंडी व पुस्तक प्रकाशनाने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा!

बारामती(वार्ताहर): नटराज नाट्य कला मंडळ संस्थेच्या वतीने कविसंमेलन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन व ब्लॅकेट वाटपाने देशाचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा 82 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे व सौ.भारती मुथा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये गझल गायक, लेकांनी आपल्या गझलचे सादरीकरण केले. महाराष्ट्राच्या विविध भागातून उपस्थित सर्व नवोदित 82 कवींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या हस्ते करण्यात आला.

नटराज कलादालनामध्ये अतुल लोंढे यांच्या काष्टशिल्पाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ अशोक प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, आबा परकाळे इ. मान्यवर उपस्थित होते. शिल्प प्रदर्शन पहाण्यास नागरीक, विद्यार्थ्यांनी गोर्दी केली होती.

रात्रौ 10 ते 12 या वेळेत फुटपाथ, एस.टी.स्टँड, दुकाने, मंडई, रेल्वेस्टेशन येथे झोपलेल्या गरीब नागरीकांना ऊबदान ब्लॅकेटचे पाघंरून घालून त्यांना साहेबांच्या वाढदिवसाची एक वेगळी भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक सुधीर पानसरे, अभिजीत जाधव, राजेंद्र बनकर, अभिजीत चव्हाण इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!