बारामती(वार्ताहर): अखंड भारताचे श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊ पाटील यांच्या विषयी भारतीय जनता पार्टी व आर.एस.एस.चे नेते चंद्रकांत पाटील, भगतसिंग कोशारी, सुधांशू त्रिवेदी, राम कदम या लोकांकडून वारंवार अवमान जनक वक्तव्य करण्यात आली होती त्यांच्या निषेधार्थ बारामती शहरामध्ये समस्त बहूजन समाजाच्या वतीने जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सिध्दार्थनगर बौध्द विहार येथून शहराच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. बारामती नगरपरिषदे समोर निषेध सभा पार पडली या मोर्च्यामध्ये हजारोच्या संख्ये बहूजन समाजातील महीला व नेते मान्यवर उपस्थीत होते. बारामतीतील व्यापारी महासंघने या मोर्चास पाठींबा देवून बारामती बंदची हाक दिली होती त्यास बारामतीकरांच्या वतीने उत्फुर्त असा प्रतिसाद देवून आपली दुकाने बंद ठेवली होती.
या मोर्चाच्या निषेध सभेची सुरूवात समता सैनिक दलाकडून त्रिसरन पंचशील घेवून करण्यात आली या मध्ये सोहेल शेख, श्री. घुले, अभिजीत काळे, साधू बल्लाळ, योगेश जगताप, मच्छिंद्र टिंगरे, विनोद जगताप, राज कुमार, या मोर्चास जय पाटील यांनी पाठिंबा देत परखडपणे निषेध व्यक्त केला.
सदरच्या मोर्चाचे आयोजन काळूराम चौधरी, गणेश सोनवणे, मंगलदास निकाळजे, अभिजीत चव्हाण, नवनाथ बल्लाळ, बबलू जगताप, सिध्दार्थ सोनवणे, अनिकेत मोहिते, गौतम शिंदे, शुभम अहिवळे, विकास जगताप, सिध्दांत सावंत, भास्कर दामोदरे, रोहित भोसले, कृष्णा क्षीरसागर, आरती शेंडगे यांनी केले होते.
आयोजकांच्या वतीने राज्यपाल भगत सिंग कोशारी यांची राज्यपाल पदावरून हकलपट्टी करण्यात यावी. चंद्रकांत पाटील यांच्यावर ऍट्रॉॅसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडे या भिमसैनिकावरील 307,353 सारखे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शाईफेक प्रकरणामधील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली. लोकमतचे पत्रकार वाकडे यांच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यात आला.
या मोर्चामध्ये भारतदादा अहिवळे, संभाजी होळकर, सुधीर सोनवणे, किशोर सोनवणे, नितीन शेलार, निलेश मोरे, दिपक भोसले, रोहन मागाडे, संतोष काकडे, राहूल कांबळे, सिध्दार्थ शिंदे, सिताराम कांबळे, आप्पा अहिवळे, सुशिल अहिवळे, अजित कांबळे, स्वप्निल जगताप, ऍड. अमोल सोनवणे, बिरजू मांढरे हे देखील उपस्थित होते. सभेची सांगता कैलास चव्हाण यांनी केली व प्रशासनास अनेक मागण्याचे निवेदन दिले व मनोज गरबडे यांच्या न्यायलयीन लढयासाठी बारामती शहरातील भिमसैनिक निधी गोळाकरून समता सैनिक दलाचे पुण्यशिल लोंढे, किरण भोसले, अमोल वाघमोरे यांच्याकडे सुपूर्त करणार असल्याचे याठिकाणी जाहीर करण्यात आले.