बारामती(वार्ताहर): आत्महत्तेस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून सत्यवान खंडागळेसह इतर तिघांची अपर जिल्हा सत्र न्यायाधिश मे.जे.पी.दरेकर यांनी निर्दोष मुक्तता केली.
12 एप्रिल 2011 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे सत्यवान शिवराम खंडागळे, दिपक सत्यवान खंडागळे, अनिल सत्यवान खंडागळे व रंजना सत्यवान खंडागळे (सर्व रा.) यांचेविरूध्द लक्ष्मण गोविंद भिसे यांच्या फिर्यादीवरून आयपीसी कलम 306,304(ब), 498 (अ), 323, 504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीची मुलगी ज्योती हिचे लग्न दिपक सत्यवान खंडागळे यांचेबरोबर करून दिले. लग्नानंतर दिपक खंडागळे यांनी नोकरीसाठी 1 लाखाची मागणी केली व त्यास फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर दिपक खंडागळे व इतर 3 यांनी ज्योती हिचा हुंड्याकामी मानसिक, शारिरीक छळ व उपाशी पोटी ठेवले व ज्योती हिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिने स्वतः स्टोव्हमधील रॉकेल अगावर ओतून घेवून स्वतःला पेटवून घेवून तिचा म्यृत्यू झाला.
फिर्यादी पक्षातर्फे साक्षीपुरावा होवून त्यामध्ये सरकारी वकील व बचाव पक्षातर्फे अंतीम युक्तीवाद होवून मे.जे.पी. दरेकर कोर्टाने सत्यवान शिवराम खंडागळे व इतरांना सेशन केसमधून निर्दोष मुक्तता केली.