अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील ग्रामपंचायत गोतंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याने संपूर्ण बहुजन बांधवांची मने दुखावली गेली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संपूर्ण गोतंडी गाव बंद ठेवण्यात आले होते.
गाव बंदसाठी सरपंच गुरूनाथ नलवडे, सदस्य पोपट नलवडे, रवि कांबळे, आप्पा पाटील, अनिल खराडे, दादाराम कांबळे, विशाल कांबळे, गोविंद कांबळे, नागनाथ कांबळे, महेश पवार, बापू पिसे, प्रकाश मोरे इ. मान्यवरांच्या विनंतीला मान देवून सर्व व्यापार्यांनी गाव बंद ठेवले होते.