अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): देशाचे माजी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस निमित्त इंदापूर मध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवा मध्ये रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी इंदापूर मधील शरद कृषी महोत्सवातील मुख्यसभा मंडपा मध्ये रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
यावेळी राज्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे पवारसाहेब आपल्याला लाभलेलं एक दुर्मिळ व्यक्ती मत्व असल्याचं सांगून अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्वास उदंड आयुष्य लाभो, अशा शब्दांत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेली पाच दशकं अविरत कष्ट करण्याची धमक वयाच्या ८२ व्या वर्षीही पहायला मिळत असून अजूनही पस्तिशीतल्या तरुणाला लाजवेल असं निखळ नेतृत्व म्हणजे पवार साहेब असून, रक्तदानाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
या वेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, संजय रूपनवर, कचरवाडीचे सरपंच के.के.पैलवान, रेहानाताई मुलाणी, मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहाय्यक अनिकेत जाधव, विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, सचिन सपकळ, युवा नेते सागर पवार,प्रशांत गायकवाड, विकास खिलारे उपस्थित आहेत.