इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके) : देशाचे नेते माजी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर या ठिकाणी भव्य शरद कृषी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ८ डिसेंबर पासून ते ११ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन होणार आहे.
यामध्ये महिला मेळावा व खेळ पैठणीचा तसेच महाराष्ट्रातील महिला वर्गात चा एकमेव आवडता गेम शो होम मिनिस्टर चा देखील कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची उद्घाटन ८ डिसेंबर रोजी माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी महिला मेळावा व खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रूपालीताई चाकणकर, सो. सुनंदा (वहिनी) पवार, मा. प्रीतमताई बेर्डे, वैशालीताई नागवडे, भारतीताई शेवाळे, वैशालीताई पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन सावित्री महिला विकास संघ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा असे आव्हान माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले आहे.
