महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेव धनगर समाजाचे इंदापूर विधानसभेत आमदार : याच तालुक्यातून धनगर आरक्षण पेटले

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): 17 टक्के धनगर समाज आहे. विधानसभेत धनगर समाजातून किमान पाच आमदार निवडून जायचे सध्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत फक्त एकमेव तेही महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय विठोबा भरणे निवडून आले त्यांना सर्व आदराने मामा म्हणतात. याच मामांच्या विधानसभेतून पुन्हा एकदा धनगर आरक्षण पेटले आहे. त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांना याबाबत आत्मपरिक्षण करण्यात गरज आहे.
बहुसंख्य धनगर समाज इंदापूर विधानसभा मतदार संघात आहे. राज्यात 30 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत. परभणी, लातूर, सातारा, पुणे, सोलापूर, धुळे सांगली, अकोला, कोल्हापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात बहुसंख्येने धनगर समाज आहे. महायुतीचे सरकार सत्तेत येण्यामागे धनगर समाजाचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे भरणेंसह पाच आमदार विधानसभेत निवडून आले होते.
महाविकास आघाडीच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात विरोधी सध्याचे सत्तेत असणारे गोपीचंद पडळकर यांनी ढोल वाजवून निषेध केला. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर व आदिवासी समाजाला आर्थिक तरतुद केली होती. आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार आले आहे त्यामुळे धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आमचं सरकार आलेनंतर आम्ही लगेच आरक्षण देवू असे म्हणणार्‍यांनी आता धनगर समाजाला वेळ न घालवता आरक्षण लागू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मोदी सरकारने 370 कलम रद्द केले. तीन तलाक कायदा केला. राम मंदीराची उभारणीची सुरूवात केली. सीएए-एनआरसीचा कायदा केला. कृषि कायदा लागू केला. मग कित्येक दिवस घोंगडं भिजत ठेवल्याप्रमाणे धनगर आरक्षणाचा प्रश्र्न मोदी सरकारने क्षणात मंजूर केला पाहिजे. मात्र या सर्व घडामोडीवरून धनगर समाजाचा अंत सर्व राजकीय पक्ष पाहत असल्याचे दिसत आहे.
विधानसभेत एकमेव आमदार दत्तात्रय भरणे धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्याच विधानसभा मतदार संघातून धनगर आरक्षण पुन्हा एकदा पेटले आहे. या पेटलेल्या आंदोलनामुळे आपोआप भरणे विरोधकांचे हातपाय बळकट करण्याचे काम होणार आहे यात तिळमात्र शंका नाही. धनगर समाजामुळे महायुतीचे सरकार सत्तेत येत असेल तर एकमेव धनगर समाजाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विकासात्मक राजकीय क्षेत्राला तडा जाण्याची शक्यता नागरीकांमध्ये वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये धनगर समाजाला पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री करण्यात आले होते. सोलापुर येथील काहींनी नाराजी व्यक्त केली तर ते पालकमंत्री पद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या यामध्ये धनगर समाज नाराज झाला होता. सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी इंदापूरला वळवण्याच्या प्रश्र्नावर भरणेंना टारगेट करण्यात आले.
आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्याचा परिणाम म्हणजे 2014 च्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत त्याचे पडसाद उमटले. धनगर आरक्षण चळवळ अतिशय सक्रीय होत गेली. या चळवळीतून महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर तर सध्या डॉ.शशिकांत तरंगे नेतृत्व तयार झालेले आहेत. आताचे नेतृत्व पाहता सरकारला घाम फोडणारे दिसत आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता फक्त आणि फक्त धनगर समाजाचा विचार करूनच पुढे आलेले समाजातील तळागाळातील व्यक्ती यामध्ये स्वत:हून सहभागी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!