देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहा महिन्यात धनगर आरक्षणाचा निकालाची खात्री – डॉ.शशिकांत तरंगे

अशोक घोडके यांजकडून…
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहा महिन्यात धनगर आरक्षणाबाबत निकाल लावण्याची खात्री मिळाली असल्याचे धनगर ऐक्य परिषदेचे डॉ.शशिकांत तरंगे यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धनगर ऐक्य परिषद समन्वयक यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाण धनगर आरक्षणबाबत सकारात्मक बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर डॉ.तरंगे पत्रकारांशी बोलत होते.

या बैठकीत धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारला काही तांत्रिक अडचणी जाणवतात त्या दूर करून शिफारस पाठवणार आहेत. यापुर्वी आदिवासी व धनगर समाजाला 23 योजना लागू केल्या होत्या त्या जानेवारीपर्यंत फंड देवून योजना सुरू करणार आहे. मेंढपाळांसाठी एक मोठी योजना सरकार आणत आहेत. महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव वाफगाव येथील वाडा रयत शिक्षण संस्थेने सोडण्यासाठी सरकार रयत शिक्षण संस्थेला पत्र पाठवून महाराजा यशवंतराव होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक बनवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. जालना जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांवर पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या चुकीच्या मारहाणीमुळे त्यांचे निलंबन करणार इ.विषय या बैठकीत जाहीर करण्यात आले.

यामुळे धनगर ऐक्य परिषदेचे डॉ.शशिकांत तरंगे यांनी पुकारलेले आंदोलन तात्पुरते मागे घेतले असल्याची घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!