धनगर ऐक्य परिषदेची राज्य सरकारने घेतली दखल मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक जलसमाधीचे आंदोलन स्थगित

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील धनगर समाजाचा गेल्या 75 वर्षापासूनचा धनगड व धनगर या “ए” आणि “ड” यातील फरकामुळे धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील धनगर व धनगड या शब्दाची दुरुस्ती करण्याची केंद्र सरकारकडे तात्काळ शिफारस करावी. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाची धनगड या चुकीच्या शब्दाची दुरुस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी दि. 05 डिसेंबर 2022 रोजी उजनी धरणामध्ये 5000 समाजबांधवासह जलसमाधी आंदोलन करणार होते. 

या जलसमाधी आंदोलनाच्या अनुषधाने पुणे ग्रामीण पोलीस विभागाकडुन महाराष्ट्र शासनाला आपल्या मागण्याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्यात आलेला होता. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने धनगर बांधवांच्या मागण्याची दखल घेवुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री  यांच्या दालनात मंत्रालय मुंबई येथे दि. 05 डिसेंबर रोजी 11.00 वा. बैठक आयोजीत केलेली आहे. 

तरी धनगर बांधवांनी स्वतः व आपले धनगर ऐक्य परिषद महा. राज्य समन्वय सदस्य असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालय मुंबई येथील दालनात हजर राहून उद्या होणारे आंदोलन स्थगित करावे अशा आशयाचे पत्र पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी  धनगर एक्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांना दिले.

यावेळी उद्याचे उजनी धरणात होणारे धनगर एक्य परिषदेचे व धनगर बांधवांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी उद्या होणाऱ्या चर्चेमधून काय मार्ग निघत आहे ते पाहून पुढील वाटचाल ठरवली जाईल. असे धनगर एक्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले.

यावेळी या बैठकीस महेंद्र रेडके, आप्पासाहेब माने, सिताराम जानकर, विशाल मारकड, संजय रुपनवर, हामा पाटील, विष्णू पाटील, मोरेश्वर कोकरे, कुंडलिक कचरे, वसंत मारकड, विजय वाघमोडे, सखाराम खोत, सागर रेडके, तुकाराम करे, सचिन तरंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!