मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्याचा वडगाव निंबाळकर येथे निषेध

बारामती(वार्ताहर): राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न सौ.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्याबाबत वडगांव निंबाळकर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला.

खा.सुळे या प्रेरणास्थान आहेत त्याबद्दल केलेले वक्तव्य कधीही सहन केले जाणार नाही. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतील कार्यकर्त्यांसह महिला भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशी वक्तव्य मंत्र्यांकडून येत असतील तर अशांना मंत्रीपदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे जयमल्हार क्रांती संघटनेचे पैलवान नानासोा मदने यांनी यावेळी प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले.

निवेदन सादर करताना जीवन गायकवाड, दत्तात्रय खोमणे, राहुल आगम, ऍड.सचिन साळवे, पांडूरंग भूमकर, शांताराम पवार, बबनराव भंडलकर, आप्पासोा भंडलकर, प्रमोद किर्वे, रामचंद्र खंडाळे, भूषण दरेकर, विनोद दरेकर, गणेश गोळे, अक्षय जाधव, आकाश साळवे, लालासोा आगम, महेंद्र भंडलकर, अर्जुन खोमणे, शशिकांत आटके, राहुल जाधव, नागेश जाधव, प्रशांत कारंडे, पुष्कराज गायकवाड इ. तीव्र प्रतिक्रीया व्यक्त करत उपस्थिती दर्शविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!