एकटा हनुमंत कवितके करतोय शासनाला चॅलेंज : शासकीय अधिकार्‍यांची बघ्याची भूमिका

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): घोरपडवाडी (ता.इंदापूर) येथील एकट्या हनुमंत वसंत कवितकेने शासनाचे नियम, अटीला काळीमाफासत थेट डांबरीकरण केलेला गोतंडी-घोरपडवाडी रस्ता उकरून महाराष्ट्र शासनाला चॅलेंज केले आहे. या कृत्याबाबत शासनाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत मूग गिळून गप्प का? याबाबत तर्कवितर्क चर्चेला उधान आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे घोरपडवाडी येथील गोतंडी- घोरपडवाडी रस्ता उकरून टाकल्याबद्दल हनुमंत वसंत कवितके यांच्यावरती कारवाई करणेबाबत ग्रामपंचायत घोरपडवाडीचे सरपंच राजेंद्र चांगण यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी तक्रार दाखल केली आहे.

हनुमंत कवितके यांना ग्रामपंचायत सदस्यांनी दोन ते तीन वेळा सांगून सुद्धा जाणून बजुन त्यांनी तो रस्ता उकरून टाकलेला आहे. रस्ता उकरल्याने गोतंडी, लोहकरेवस्ती, कदमवस्ती, कांबळेवस्ती, शिंदेवस्ती, घोरपडवाडी शेतकरी व ग्रामस्थांचे रस्ता उकरल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे.

नुकत्याच दिवाळीच्या सुट्‌ट्या संपल्या असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. सध्या तो रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद झालेला आहे. तरी तो रस्ता वालचंदनगर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून खुला करून देण्यात यावा, नागरिकांसाठी तो रहदारीस खुला करण्यात यावा अशी मागणी या दिलेल्या पत्रात केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!