बारामती(वार्ताहर): येथील लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल अपशब्द केल्याच्या निषेधार्थ बारामतीत निषेधार्थ मोर्चा काढून प्रत्येक चौक अब्दुल सत्तार यांच्या विरोधात देण्यात आलेल्या घोषणेने दणाणून गेला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन गाढवे आणून त्या गाढवाला अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र लावून निदर्शने केली. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे विशेषत: महिलांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. मंत्रीपदाचा राजीनामा देणेत यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
8 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर, शहराध्यक्षा अनिता गायकवाड, योगेश जगताप, सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.