अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु शिवराळ भाषेत बोलणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही यामुळे अब्दुल सत्तारांवर कारवाई करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे जतन करावे असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांचेबद्दल बेताल वक्तव्य करून महिलांचा अवमान केल्याबद्दल कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज मंगळवार दि. ०८ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंदापूर नगरपरिषद ते पोलिस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना निवेदन देत कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी गारटकर बोलत होते.
गारटकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी असते आणि त्यांच्याच मंत्रि मंडळातील कृषी मंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार पणे बेताल वक्तव्य केले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे यावर मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करून महाराष्ट्रातील सुसंस्कृत वातावरण कायम ठेवावे असे मत व्यक्त केले.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, माजी सभापती प्रशांत पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस संग्राम पाटील, वरकुटेचे सरपंच बापूराव शेंडे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,उपसरपंच दिलीप पाटील, युवकाध्यक्ष अँड. शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, बाळासाहेब व्यवहारे, सागर मिसाळ, श्रीधर बाब्रस, अमर गाडे, अनिकेत वाघ, दादा सोनवणे, संजय सोनवणे,विशाल मारकड, दादासाहेब भांगे,महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, शहराध्यक्ष उमा इंगोले, पुणे जि.युवक सरचिटणीस प्रफुल्ल पवार, समाधान बोडके, सरचिटणीस इंदापूर ता.नानासो भोईटे, उपाध्यक्ष युवक इंदापूर ता.अक्षय कोकाटे उपसरपंच, सुनिल मोहीत-पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.