बारामती(वार्ताहर): झैनबिया स्कूलच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौंडचे आयोजन करण्यात आले होते. या दौंडला बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पारवडी केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास बागडे, डॉ.आनंद हरके या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व केंद्र शासन गृहविभागाच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौड रॅलीचे आयोजन कारभारी सर्कल चौक ते झैनबिया स्कूल, बारामती इथपर्यंत करण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, क्रीडा प्रेमी इ. सहभाग दर्शविला होता.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका इन्सिया नाशिकवाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.