अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): आगामी काळात वीस हजार दूध संकलन करून शेतकर्यांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देवराज दूध डेअरीचे चेअरमन तुषार (बाबा) जाधव यांनी सांगितले.
देवराज फ्रुट प्रा. लि. व देवराज दूध डेअरी यांच्या वतीने शेतकर्यांना दिवाळीनिमित्त बोनस व व्यवसायाभिमुख भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी श्री.जाधव बोलत होते.
यावेळी माजी उपसभापती देवराज (भाऊ) जाधव, माजी उपसरपंच अशोक मिसाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य ड.सुभाष भोंग, अनिल भोंग, हनुमंत राऊत, दादा पाटील, प्रहार संघटनेचे संजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ खराडे, पै. संतोष जाधव, विनोद डोंगरे, विजय हेगडे, राजकुमार जठार इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री.जाधव पुढे बोलताना म्हणाले की, सध्या या डेअरी मध्ये सात ते आठ हजारापर्यंत दूध संकलन होते. देवराज उद्योग समूहात काम करणार्या शेकडो कामगारांना बोनस व कपडे दिवाळीनिमित्त भेट देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या उद्योग समुहा मार्फत करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी ग्रामस्थ तसेच दूध उत्पादन शेतकरी देवराज उद्योग समूहात काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.