आई प्रतिष्ठानचा सार्थ अभिमान – खा.सुप्रिया सुळे

बारामती(प्रतिनिधी): आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय चांगले सामाजिक व विधायक उपक्रम राबविता याचा सार्थ अभिमान असल्याचे मत बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व बा.न.प.चे माजी बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांच्यावतीने एक हजार गोर-गरीब, गरजु कुटुंबियांना फराळ, अभ्यंगस्नान व साडी या सर्वांचे किट वाटप खा.सुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँकचे चेअरमन सचिन सातव, मा.उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सौ.शुभांगी चौधर, मा.नगरसेविका डॉ.सुहासिनी सातव, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, युवती शहराध्यक्षा सौ.आरती शेंडगे, माळेगाव कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, आम मुस्लिम युथचे अध्यक्ष इमरान पठाण, आबा पागळे, विपुल ढवाण, निलेश कोठारी, संतोष जगताप, मुस्तफा हवेलीवाला,दिलीप ढवाण, तैनुर शेख, राहुल जाधव, पार्थ गालिंदे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना खा.सुळे म्हणाल्या की, प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सातत्य ठेवून अतिशय चांगला उपक्रम राबवित आहात. ज्यावेळी नागरीकांना आधाराची गरज असते त्यावेळी दोन पाऊल पुढे येऊन आधार देता ही कौतुकाची बाब आहे.

लॉकडाऊन कोरोना काळात याठिकाणी उपस्थित मान्यवरांनी जी सेवा केली त्याचे आभार त्यांनी मानले. अजितदादांनी प्रत्येक गोष्ट बारामतीकरांना मिळण्यासाठी प्रयत्न केले. या काळात सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले होते. मात्र, 24 तास शेती सुरू होती त्यामुळे प्रत्येक नागरीकाला अन्नधान्य, पालेभाज्या मिळाल्या. आज मात्र, त्याच शेतकर्‍यांची बिकट अवस्था झालेली आहे. अतिवृष्टीमुळे सर्व शेती पाण्याखाली गेली आहे. पिकांचे अतोनात नुसान झाले आहे असेही त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडी च्या पदाधिकार्‍यांनी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर व घरी जावून त्यांना फराळ द्या, त्यांच्याशी चर्चा करा, धीर द्या अशी विनंती त्यांनी केली आहे. आज त्यांना आधाराची गरज आहे असेही त्या म्हणाल्या.

अजितदादांनी सरकारला शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. सर्वसामान्य नागरीक महागाईसाठी झगडत आहे. फटाक्याचे दर 40 टक्क्याने वाढले आहेत. व्हॉटस्‌ऍपवरची करंजी व लाडू यावरच काहींना समाधान मानावे लागत असल्याचेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी नवनाथ बल्लाळ, इम्रान पठाण, संभाजी होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सत्यव्रत काळे यांनी केले. सुत्रसंचालन अनिल साळवे पाटील व सलीम सय्यद यांनी केले.

कार्यक्रमा दरम्यान बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानात अनिल साळवे लिखित गाणं सलीम सय्यद यांनी उत्कृष्ठरीत्या मांडणी करत गालिये यावेळी उपस्थित महिला भावनिक झाल्या होत्या तर काहींना अश्रु थांबविता आल्या नाही.

फुलो का, तारो का सबा कहेंना है…
खा.सुप्रिया सुळेंनी उपस्थित महिलांना संबोधून भाषण करताना म्हणाले की, फुलो का, तारो का सबका कहेंना है, एक हजारोमें हमारा भाई (सत्यव्रत) है! त्यावर उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. चांगल्या उपक्रमास बोलाविले त्याबद्दल आभार मानले.आज सामाजिक बांधिलकी जपली या सर्वांचे आशिर्वाद थेट आई प्रतिष्ठान व सत्यव्रत काळे यांच्या अकौंटला जाणार आहेत. महिला, लहान मुलांचे आशिर्वाद तुम्हाला मिळाले आहे असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!