बारामती(वार्ताहर): शेळगांव (ता.इंदापूर) येथे घरगुती झालेल्या खूनाच्या खटल्यातून आरोपी रावसाहेब वैकु वाघमोडे, वैकु रामा वाघमोडे (दोघे रा.254, ता.माळशिरस, जि.सोलापूर) महादेव गोविंद वाघमोडे (रा.शेळगांव, ता.इंदापूर) यांची बारामती येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश जेए.शेख यांनी निर्दोष मुक्तता केली.
बारामती येथील जिल्हा सत्र न्यायालयात सेशन केस नं.16/2016 खून खटला दाखल करण्यात आला होता. आरोपींवर भा.द.वि.कलम 302, 307, 323, 405,406 आर/डब्ल्यू 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आरोपीच्या वतीने ऍड.वैभव काळे, ऍड.बाबाजान शेख, ऍड.विवेक बेडके, ऍड.रियाज खान यांनी आरोपीची बाजु मांडत फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष खोटी ठरवत आरोपींच्या बाजुने योग्य युक्तीवाद केला. आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरत सदरील आरोपींना मे.कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.