बारामती(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हजरत मोहम्मद पैगंबर (स.) जयंतीनिमित्त अखिल आमराई मुस्लिम जमातीच्या वतीने बा.न.प. उर्दू शाळा क्र.4 च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे वाटप करून विधायक उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, पुणे जिल्हा केडरचे अध्यक्ष विजय शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी टेंगले पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल आमराई मुस्लिम जमातचे अध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शब्बीर शेख यांनी केले होते.
यावेळी संभाजी होळकर, जय पाटील यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, हारूणबाबा शेख, अजिज बागवान, महंमद मुलाणी, नासीर शेख, पत्रकार सागर भिसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी उर्दू शाळेचे श्री.पठाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.