अनेक धम्मपरिषदा पाहिल्या, पण बौद्ध समाजाचा महामेळावा प्रथमच पाहत आहे – प्रा.जोगेंद्र कवाडे

बारामती(वार्ताहर): अनेक धम्मपरिषदा पाहिल्या, पण एवढा भव्य-दिव्य आर बौद्ध समाजाचा महामेळावा प्रथमच पाहत असल्याचे प्रतिपादन पीपल्स्‌ रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केले.

66 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती येथे थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी प्रा.कवाडे बोलत होते.

या कार्यक्रमास बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बानपचे मा.बांधकाम सभापती सत्यव्रत काळे, सिद्धनाथ भोकरे, नितिन मोहिते, सचिन मोरे, सिद्धार्थ अहिवळे, इम्रान पठाण, वतन की लकीरचे संपादक तैनुर शेख, गजानन गायकवाड, राकेश वाल्मिकी, मंगलदास निकाळजे, संतोष वाघमारे इ.मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.कवाडे म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी नागपूर ते औरंगाबाद पर्यंत काढलेल्या सर्वात मोठ्या मोर्चाबाबत बोलताना नामांतराच्या लढ्यातील सोळा वर्षाचा इतिहास कवाडे सरांच्या भाषणातून डोळ्यासमोर उभा राहिला. बौद्ध मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संघटनेचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक नवनाथ बल्लाळ म्हणाले की बौद्ध समाजातील जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन एमपीएससी व युपीएससीची तयारी करावी यासाठी लवकरच संघटनेच्या माध्यमातून अशा स्पर्धा परिक्षांसाठी अभ्यास केंद्र सुरु करणार आहोत.

महाराष्ट्र सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव, संकल्प गोळे, यांचा प्रबोधनपर बुद्ध भीम गीतांचा उत्साहात संपन्न झाला.

बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, भाजपाचे अनुसूचित जाती प्रदेश सदस्य सचिन साबळे, अमोल वाघमारे, निलेश मोरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड.विनोद जावळे,अजित कांबळे, नितिन शेलार, बारामती शहर वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष अक्षय शेलार, गणपत शिंदे, किशोर सोनवणे, सुशांत जगताप, प्रा.मिलिंद कांबळे, देविदास गायकवाड, नाना लोंढे, जवाहरलाल सोनवणे, देवा कांबळे, सागर गायकवाड,धीरज भोसले, श्रीनाथ शेलार, मयूर झेंडे, शंकर सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, सागर शिलंवत, सप्नील जगताप इ. मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन साबळे यांनी केले. सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी तर शेवटी आभार ऍड.विनोद जावळे यांनी मानले. याप्रसंगी हजारांहून अधिक समाज बांधव उपस्थित होता.

आंबेडकरी चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदानाबद्दल जीवन गौरव व समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत…
प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांना जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सुधीर (नाना) सोनवणे, राजकुमार भोसले, किशोर सोनवणे, मरणोत्तर राजदत्त उबाळे, पांडुरंग शेलार बापट कांबळे, सुनील धीवार, महादेव जगताप, पंकज धीवार, रणधीर मोहिते, दत्तात्रय लोंढे, तसेच हलाखीच्या परिस्थितीत मुलांना शिक्षण देऊन पोलीस उपनिरीक्षक केल्या बद्दल सौ.लता मिलिंद शिंदे व सौ.सुनंदा सुभाष मोरे व समाजातील पाहिले सोन्या चांदीच्या यशस्वी व्यवसायाबद्दल सौ सारिका अमोल वाघमारे या मान्यवरांना बौद्ध युवक संघटनेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!