बारामती(वार्ताहर): शासकीय कामात अडथळा आणला म्हणून वाघळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी दादू भगवान मांगडे यांच्या विरोधात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला गु.र.नं.346/2022 नुसार भा.द.कल. 332, 353,384, 504, 506 आणि 3(1)(r), 3(2)(va) अंतर्गत आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी दाूद मांगडे यांचे वकील ऍड.संतोष एम.येडे यांनी मे.कोर्टात जामीनाचा अर्ज मांडला असता, त्यात केलेल्या युक्तीवादामुळे मे.जिल्हा अति.न्यायाधिश सोा यांनी दादू मांडगे यांचा जामीन मंजूर केला.
ऍड.संतोष येडे यांनी युक्तीवादामध्ये ज्या दिवशी गुन्हा घडला त्यादिवशी शासकीय सुट्टी होती. त्यामुळे शासकीय कामात अडथळा कसा झाला याबाबत केलेला युक्तीवाद मे.कोर्टाने ग्राह्य धरून आरोपी मांगडे यांना जामीन मंजूर केला.