शिर्सुफळच्या माजी सरपंच व उपसरपंचावर सावकारकीचा गुन्हा दाखल

बारामती(वार्ताहर): सावकारकीचा परवाना नसताना भिमाजी भंडारे, शिर्सुफळचे माजी सरपंच अतुल हिवरकर, शिर्सुफळचे माजी उपसरपंच विश्वास आटोळे, संजय निंबाळकर, ऋतुजा ढवाण यांच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशनला गु.र.नं.539/2022 अन्वये भा.द.वि.कलम 506,34 महाराष्ट्र सावकारीचे अधिनियम 2014 चे कलम 39,45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रीमती भारती संभाजी जाधव (वय-40 वर्षे, रा.काटेवाडी, ता.बारामती, सध्या रा.तांबेनगर, बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार वरील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की, वरील आरोपी भिमाजी भिकाजी भंडारे (रा.भंडारेवस्ती एरंडोली,अहमदनगर) विश्वास आटोळे, अतुल हिवरकर (दोघे रा. शिर्सुफळ ता.बारामती) संजय निंबाळकर (रा.लासुर्णे ता.इंदापुर) ऋतुजा ढवाण (रा.कसबा बारामती) यांनी संगनमत करून त्यांचेकडे सावकारी करणेचा परवाना नसतानाही फिर्यादी महिलेला व्याजाने दिलेल्या पैशापेाटी फिर्यादीला वेळोवेळी धमकावुन तसेच मानसिक त्रास देवुन फिर्यादीला मौजे गाव रूई बारामती एम.आय.डी.सी. बारामती येथे असलेला प्लॉट नं. 56 सुयश सहकारी गृह रचना संस्था मर्या. एम.आय.डी.सी.बारामती जि.पुणे या ठिकाणी असलेला रो-हाउस नं. 11 हा दस्त करून भिमराव भंडारे यांचे नावे करून घेतला आहे.

सदर प्रकरणाचा तपास सपोनि विधाते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!