बारामती: येथील बारामती नगरपरिषदेच्या सफाई कर्मचार्यांच्या महत्वाचे प्रलंबित विषयाबाबत केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे महाराष्ट्राचे निरीक्षक डॉ.सुधाकर पणीकर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक संपन्न झाली.
यावेळी पुणे महानगर पालिकेचे मा.नगरसेवक विनोद निनारीया, सफाई कर्मचारी संघटना पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी पद्मजा डाईंगडे, अस्थापना खाते प्रमुख श्री.तोडकर, आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, बांधकाम विभागाचे प्रमुख रत्नरंजन गायकवाड इ. उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन व प्रास्ताविक पत्रकार व बारामती हरिजन को-ऑप सोसायटीचे चेअरमन विश्र्वास उद्धव लालबिगे यांनी केले होते.
यावेळी वारसा हक्काचा प्रलंबित विषय व सीपीएस भविष्य निर्वाह निधीतून कर्ज मिळावे असे विविध 26 प्रश्र्न निरीक्षक पणीकर यांच्या उपस्थितीत मार्गी लावण्यात आले. हे प्रश्र्न मार्गी लागल्याने कर्मचारी वर्गामध्ये आनंद व्यक्त केला. शेवटी आभार आरोग्य निरीक्षक राजेंद्र सानेवणे यांनी मानले. यावेळी सर्व सफाई कर्मचारी व पदाधिकारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.