बारामती(वार्ताहर): राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर अध्यक्षपदी आले जय पाटील, पक्षात कुजबूज होती इम्तियाज शिकीलकर जातील अशा चर्चेला बारामती शहरात उधान आले आहे.
मध्यंतरी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी युवकांना संधी दिली पाहिजे. त्यानुसार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार जय पाटील यांची निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले आहे.
बारामती शहरात आलेली मरगळ, संघटनात्मक बांधणीबाबत होत असलेली मागणी या सर्व बाबींचा विचार करीत युवकाच्या हाती शहराध्यक्ष पदाची धुरा दिलेली आहे.
जय पाटील यांची राजकीय कारकिर्द सरपंच पदापासुन खुप कमी वयात सुरू झालेली आहे. सक्षम व प्रभावी काम त्यांनी केले. नगरपरिषदेची वाढीव हद्दीनंतर तांदुळवाडी येथुन दोन वेळा नगरसेवक होण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. यामध्ये उपनगराध्यक्ष म्हणून चोख नगरपरिषदेची धुरा सांभाळली. तांदुळवाडी परिसरात वृक्षारोपण केले. विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख गगनभरारी घेत आहे. त्यांच्या निवडीमुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.