बारामती(वार्ताहर): प्रत्येक महिला आपआपल्या कुटुंबाच्या बंधनात राहुन सक्षमतेने समाजात काम करू शकतात असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ.रूपाली ठोंबरे पाटील यांनी केले.
नवरात्र दसरा व दिवाळी महोत्सवानिमित्त सहारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवेज सय्यद यांच्या वतीने बारामती येथील जगदंबा मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या होम मिनिस्टर बारामती-2022 कार्यक्रमात सौ.ठोंबरे पाटील बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, चंदुकाका सराफ अँड सन्सच्या संचालिका नेहा शहा, मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, मा.नगरसेवक जयसिंग देशमुख, बा.न.प. शिक्षण मंडळाचे मा.सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद, मा.उपनगराध्यक्ष सौ.तरन्नुम सय्यद, बाळासाहेब चव्हाण पाटील, दिलीप ढवाण पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.ठोंबरे म्हणाल्या की, या कार्यक्रमात सहभागी होऊन स्पर्धेत भाग घेणार्या महिला खर्या रणरागिणी आहेत. अशा महिलांमुळे आमच्यासारख्या महिला घराबाहेर पडून समाजाची कामे करू शकतो. स्त्रीया स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पवार साहेबांनी 50 टक्के महिलांना आरक्षण दिले. मध्यंतरी बारामतीत केंद्रीय मंत्री सितारामण येऊन गेल्या. बारामती करांनी जो त्यांना प्रतिसाद दिला त्यावरून त्यांची पात्रता कळालीच असेल. याठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाच्या माहिला एकत्र आल्या आहेत या सर्वांनी मिळून अशा लोकांपासून बारामती वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांनी एकमेकींची उणीधुणी काढत बसता कामा नये याचा फायदा भाजप सारखा पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही असेही त्या म्हणाल्या. महिलांनी एकत्र राहुन स्वत:चा, कुटुंबाचा, राज्याचा मग देशाचा विकास केला पाहिजे. एकमेकींचा आदर केला पाहिजे. शिक्षण, काम व कुटुंब सांभाळण्याचे काम परमेश्र्वाराने दिले आहे ते येणार्या काळात एकमेकींच्या साथीने करा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमास खंडोबानगर, मोरगाव रोड, सिकंदरनगर, जामदार रोड व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला व कार्यक्रमाचा आनंद घेतला.
यावेळी जय पाटील, सचिन सातव यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गिरीष लोणकर, महेश बारावकर, सागर ढवाण, विकास राऊत, सलीम तांबोळी, आसिफ झारी, वीरसेन बनकर, जयेंद्र ढवाण, तबरेज सय्यद, शाहिद सय्यद, सुभान कुरेशी, रोहन पवार, इम्रान मोमिन, आदित्य पारखे इ. मोलाचे परिश्रम घेतले.
अनिल सावळेपाटील प्रस्तुत होममिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा कार्यक्रमाध्ये महिलांनी खेळ,मनोरंजन, उखाणे, म्हणी, चित्रपटातील गीते, नृत्य, प्रश्र्न मंजुषा इ. आनंद घेतला. अनिल साळवे पाटील यांना उत्कृष्ठ गायक सलिम सय्यद यांची मोलाची साथ मिळाली.
होममिनिस्टर खेळामध्ये उषा जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय सोनाली ननवरे व मालती गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.