बारामती(वार्ताहर): अंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत भारताकडून टिम स्पोर्टस एल.यु.पी.इंडियातर्फे बारामतीचा श्र्लोक अभिनंदन दोशी (खटावकर) याने 17 वर्ष वयोगटात चार सुवर्ण पदके पटकावून आपल्या भारत देशाची मान उंचावली आहे.
रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव स्केटिंग फेडरेशनतर्फे दि.24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी मालदीवची राजधानी मालेसिटी व हुलहू माले सिटी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातील एकशे तेवीस खेळाडुंनी सहभागी नोंदवला होता.
श्र्लोकने 100,500, 1000 व 5000 मी. स्पीड स्केटिंग रेस मध्ये चार सुवर्ण पदक पटाकावले. त्याने 100 मीटर अंतर 9 सेकंदामध्ये पार केले आहे. मालदीव ऑलम्पिक कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल सत्तार, माजी ऑलम्पिक कमिटी अध्यक्ष इब्राहिम इस्माइल, स्पोर्ट्स मिनिस्टर गव्हरमेंट ऑफ मालदीव उपमंत्री व अध्यक्ष महंमद अजमीत तसेच टिम स्पोर्ट्स एवं.यु.पी.इंडियाचे अध्यक्ष वैभव बिळगी यांच्या हस्ते श्लोकला सुवर्णपदके व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. श्र्लोक जनहित प्रतिष्ठान बारामती या विद्यालयालात दहावीचे शिक्षण घेत आहे.

श्लोक ने आता पर्यंत राष्ट्रीय तथा अंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमधून 16 गोल्ड, 6 सिल्व्हर, 5 ब्रॉन्ज पदके मिळविलेली आहेत. तसेच त्याच्या नावावर नामांकित 5 बुक ऑफ रिकॉर्ड रजिस्टर आहेत.
दैनंदिन सराव, जिद्द, चिकाटीमुळे श्र्लोकने नावलौकीक मिळविलेले आहे. या यशामध्ये आई, वडील, दोशी कुटुंबीय यांचे वेळोवेळी प्रोत्साहन आणि त्याचे प्रशिक्षक विजय मलजी, उमर पठाण, प्रणाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. श्र्लोकच्या यशामध्ये प्रशिक्षक विजय मलजी यांचा सिंहाचा वाटा आहे. श्र्लोकवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.