अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): तालुक्यातील भरणेवाडी येथील श्री बिरोबा यात्रेनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बिरोबाच्या नावानं चांगभलं म्हणत दर्शन घेतले.
भरणेवाडी येथील ग्रामस्थांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांना काठी आणि घोंगडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे मुख्य दैवत बिरोबा मानले जाते. यात्रेनिमित्त बहुसंख्य नागरीक याठिकाणी येऊन बिरोबाचे दर्शन घेत असतात. माजी मंत्री भरणे यांनी यावेळी बिरोबाला साकडे घालून सर्वांचे चांगले व्हावे यासाठीची प्रार्थना केली. बिरोबा देवाचे दर्शन घेऊन, कपाळी भंडारा लावून, बिरोबाच्या नावानं चांगभलं असे म्हटले.
कोरोना कालावधीनंतरच्या या यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.