बारामती शहरात ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत तपासणीस नागरीकांचा प्रतिसाद

प्रभाग 16 चे नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे ‘आपला प्रभाग, सुरक्षित प्रभाग’ याप्रमाणे काम!

बारामती(वार्ताहर): राज्य शासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेस प्रभाग क्र.16 च्या नगरसेविका सौ.बेबीमरियम बागवान यांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक अमजद बागवान, अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहन भटीयानी हे सुद्धा या मोहिमेत ‘आपला प्रभाग, सुरक्षित प्रभाग’ याप्रमाणे सामाजिक जान व भान जपत काम करीत आहेत.

या मोहिमेत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींच्या अंगातील तापमान व ऑक्सिजनची नोंद घेतली जात आहे. यामध्ये ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंगातील ताप व ऑक्सिजनची पातळी कमी भासल्यास त्याची मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरीकांनी मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता स्वत:हून समोर येऊन आपली तपासणी करून घ्यावी असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक गौतम जाधव, डॉ.जनार्दन पवार हे तपासणी करून त्याची नोंद घेत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सांगितल्या प्रमाणे या मोहिमेद्वारे राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शासन करणार असून यात लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे हे प्रत्यक्ष उतरविण्याचे काम प्रभाग क्र.16 च्या नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे आज राज्याचे दोन नंबरचे पदाची जबाबदारी चोख बजावीत आहेत. या व्यस्त जबाबदारीतून बारामती तालुका व शहरातील प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष आहे. ना.अजितदादांच्या कामाचा झपाटा पाहता बारामतीचा प्रत्येक नागरीक दादांवर विश्र्वास ठेवून दोन हात करून कोरोनाशी लढत आहे. त्याला माहिती आहे अर्ध्या रात्री बारामतीकरांसाठी पळणारा नेता अजितदादा आहे. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेस सुद्धा नागरीक स्वत:हून सहकार्य करणार यात शंका नाही.“, नगरसेविका सौ.बेबीमरियम अजिजभाई बागवान .

89 वर्षाच्या आजी ठणठणीत….
तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचे माजी अध्यक्ष स्वप्निल भागवत यांच्या आजी (आईची आई) याठिकाणी राहणार्‍या बबईबाई मारूती दळवी या 89 वर्षाच्या आजी आहेत. त्यांचे अंगातील तापमान 35.9, ऑक्सिजन 95 तर पल्सरेट 83 आहे. युवक युवतींना लाजवेल अशी आजमितीस ठणठणीत तब्येत त्यांची आहे.

2 thoughts on “बारामती शहरात ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत तपासणीस नागरीकांचा प्रतिसाद

  1. निष्पक्ष, निर्भिड, समाजाभिमुख पत्रकारिता महणजे अर्थातच तैनुरभाई शेख व त्यांचे न्यूज चॅनल व साप्ताहिक वतन की लकीर !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!