पुणे : अल्पसंख्याक घटकांतील पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे ‘प्री मॅट्रिक’ शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. अर्ज भरण्याची सोय www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असल्याचे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी सांगितले आहे. या शिष्यवृत्ती मध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागु राहणार आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही याची नोंद घ्यावी