बारामती दि. 15:- बारामती शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, असे निर्देश मुख्याधिकारी किरणराज राज यादव यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत.
एका पथकाकडून दिवसात 60 ते 75 कुटुंबाची आरोग्य तपासणी होणार असून पथकांस आरोग्य तपासणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणी दिनांक, ठिकाण व प्रभाग क्रमांक पुढीलप्रमाणे आहे :- बुधवार 16 सप्टेंबर 2020- धो.आ. सातव शाळा, जगताप मळा, प्रभाग क्रमांक 9 व 19, बालकल्याण मुकबधिर शाळा, लक्ष्मीनारायण नगर कसबा, प्रभाग क्र. 10, व 11, शारदा प्रागण शाळा, प्रभाग क्रमांक 12,15,16 व 18. शुक्रवार 18 सप्टेंबर 2020- शारदा प्रागण शाळा, प्रभाग क्रमांक 8,13,14 व 17 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळवाडी प्रभाग क्रमांक 1,2,4,7,3,5 आणि 6.
तपासणीमध्ये आढळलेल्या रुग्णांवर तपासणीच्या दुस-या दिवशी उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपाध्यक्ष तरण्णूम अल्ताफ सैयद, मुख्याधिकारी किरणराज यादव आणि सर्व नगरसेवक यानी केले आहे.