बारामती(वार्ताहर): गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला शिवाजी चौक ते गुनवडी व मळदला जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरण बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले.

दि.11 डिसेंबर 2019 रोजी तरन्नुम सय्यद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे या रस्त्याबाबत कळविले होते. त्यानुसार सतत पाठपुरावा चालु ठेवला होता. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे नागरीक जीव मुठीत घेऊन या रस्त्याने वाहने हाकत होती. कित्येक वेळा या खराब रस्त्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी सुद्धा या रस्त्याची पाहणी करून तशा सूचना बांधकाम विभागास केल्या असल्याचेही सय्यद यांनी पत्रात नमूद केले होते. शेवटी ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले. सर्वत्र तरन्नुम सय्यद यांचे कौतुक होत आहे.
